Skip to content

रेशन कार्ड धारकांना दिवाळी पॅकेज मिळणार | Ration Card Diwali Package Marathi

Ration Card Diwali Package Marathi

खुशखबर रेशन कार्ड धारकांना दिवाळी पॅकेज मिळणार आहे केवळ १०० रुपयांत रवा, चणाडाळ, साखर, व तेल ही वस्तू रेशन कार्ड धारकांना या दिवाळी मिळणार आहे

रेशन कार्ड धारकांना दिवाळी पॅकेज मिळणार

Ration Card Diwali Package:- राज्यातील १ कोटी ७० लाख शिधापत्रिकाधारक कुटुंबांना म्हणजेच ७ कोटी लोकांना दिवाळी भेट मिळणार आहे. केवळ १०० रुपयांत शिधा वस्तूंचे पॅकेज देण्याचा निर्णय झाला. या पॅकेजमध्ये प्रति १ किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर तसेच १ लिटर पामतेलाचा समावेश असेल.

शिधापत्रिकाधारकांना मिळणार दिवाळी भेट दिवाळीच्या निमित्ताने राज्यातील शिधापत्रिकाधारकांना शिधा वस्तूंचे दिवाळी पॅकेज केवळ 100 रुपयांत देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

या संचामध्ये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना प्रति 1 किलोच्या परिमाणात रवा, चणाडाळ, साखर व 1 लिटर पामतेल याचा समावेश असेल. राज्यातील 1 कोटी 70 लाख कुटुंबांना म्हणजेच सुमारे 7 कोटी लोकांना याचा प्रत्यक्ष लाभ होणार आहे.

ई श्रम कार्ड चे फायदे आणि लाभ

हा संच एक महिन्याच्या कालावधीकरिता देण्यात येऊन त्याचे वितरण ई-पॉस प्रणालीद्वारे करण्यात येईल. यासाठी येणाऱ्या एकूण 513 कोटी 24 लाख खर्चास देखील मान्यता देण्यात आली.

सदरहू शिधावस्तूंचा संच दिवाळीपूर्वी वाटप व्हावा, त्याचप्रमाणे कुठल्याही तक्रारी येऊ नये याची खबरदारी अन्न व नागरी पुरवठा विभागाने घेण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.